कृष्णा आणि सुदामा वेगवेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातून येतात. तरी त्यांच्यातील मैत्री घट्ट होती.
सुदाम्याने निस्वार्थी मनाने श्रीकृष्णाची भेट घेतली. आणि कृष्णानेही खुल्या मनाने त्याचे स्वागत केले.
सुदाम्याचा कृष्णाप्रती नम्रता भाव वाखाणण्याजोगा आहे.
त्याने कुठेच आपल्या कष्टाची वाच्यता केली नाही. त्याच्या साधेपणा खूप काही शिकवून जातो.
सुदाम्याची आर्थिक बाजू कमजोर होती पण त्याची अध्यात्मिक ताकद खूप होती. हीच त्याला आनंदी ठेवत होती.
सुदाम्याची कृष्णाप्रती निस्सिम भक्ती होती. त्याच्या भक्तीला कशाचे बंधन नव्हते.
मित्राप्रती भगवान श्रीकृष्णाने दाखवलेले औदार्य आणि दयाळूपणाचा भाव आपण नक्कीच घेऊ शकतो.
सुदाम्याचा श्रीकृष्णावर विश्वास होता. त्याने संयम पाळला आणि त्याची प्रचिती त्याला आली.
कृष्णा आणि सुदामा यांना एकमेकांप्रती प्रचंड आदरभाव होता. त्यामुळे सुदामाने काही न सांगताही कृष्ण त्याच्या मनातील भाव ओळखू शकत होता.