Disclaimer

वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.

मीन (Pisces)

तिन्ही ग्रहांच्या संयोगाने मीन राशीच्या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढेल. कामात यश मिळेल. गरजेच्या वेळी तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. आर्थिक लाभाचीही दाट शक्यता आहे.

वृश्चिक (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांना हा काळ चांगला परिणाम देईल. तुम्हाला बढती-वाढ मिळू शकते. भाग्य तुमच्या सोबत असणार आहे. व्यापारी वर्गालाही फायदा होईल.

सिंह (Leo)

सूर्य, बुध, गुरूचा संयोग सिंह राशीच्या लोकांना मान-पैसा-प्रतिष्ठा सर्वकाही देणार आहे. या लोकांचं बँक बॅलन्स वाढणार आहे. अचानक कुठूनही पैसा मिळू शकतो. गुंतवणुकीतून लाभ होणार आहे.

कर्क (Cancer)

ग्रहांची महायुती कर्क राशीच्या लोकांना नातेसंबंधांच्या बाबतीत खूप लाभदायक असणार आहे. जर कोणाशी मतभेद झाले असतील तर ते संपतील. नवीन नोकरीची संधी मिळले. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी ही महायुती खूप लाभदायक आहे. या लोकांना मोठे यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगला वेळ जाईल. तुमचा प्रभाव वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणत्याही आजारापासून मुक्ती मिळू शकते.

महायुतीमुळे भाग्यदोय

सूर्य, गुरु आणि बुध यांची महायुती झाली आहे. सूर्य हा यशाचा, आत्मविश्वासाचा कारक आहे. तर गुरु हा वैवाहिक जीवन आणि आनंद देणारा ग्रह आहे. बुध हा धन, व्यवसाय, बुद्धिमत्ता यांचा कारक आहे. चला जाणून घेऊयात कुठल्या राशीचं भाग्य उजळणार ते.

VIEW ALL

Read Next Story