Ganga Dussehra 2023 Upay

करिअरमध्ये प्रगती, संपत्ती आणि कर्जमुक्तासाठी करा 'हे' उपाय

आज गंगा दसरा

आज गंगा दसरा हा सण साजरा होत असून हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे.

गंगेची पूजा

हा सण दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला येतो आणि या दिवशी संपूर्ण विधीपूर्वक गंगेची पूजा केली जाते.

पौराणिक कथा

ज्येष्ठ महिन्याच्या दहाव्या दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती. म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व असून आज गंगेत स्नान केल्याने पापमुक्त होतो, असा समज आहे.

गंगा दसरा उपाय

या दिवशी काही उपाय केले तर पैसे मिळण्याचे नवीन मार्ग खुले होतात आणि कर्जापासून मुक्ती मिळते.

पापांपासून मुक्तता

गंगेत स्नान केल्याने व्यक्तीला 10 प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते.

नोकरीसाठी उपाय

तुम्हाला नोकरीच्या क्षेत्रात अडथळे येत असतील या दिवशी मातीचे भांडे आणून त्यात गंगाजलाचे काही थेंब आणि थोडी साखर घाला. त्यानंतर हे भांडे पाण्याने भरून एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा.

कर्जमुक्तीसाठी उपाय

कर्जमुक्तीसाठी तुमच्या लांबीएवढा काळा धागा घेऊन तो नारळावर गुंडाळून शिवलिंगासमोर ठेवावा. त्यानंतर भगवान शंकराची प्रार्थना करा आणि संध्याकाळी ते नारळ वाहत्या पाण्यात वाहू द्या.

आर्थिक प्रगतीसाठी

पैशांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर गंगा दसर्‍याच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून भगवान शंकराच्या मंदिरात जावे. तिथे जाऊन शिवलिंगाला गंगेच्या पाण्याने अभिषेक करा. लक्षात ठेवा की पाण्याच्या भांड्यात थोडे गंगेचे पाणी साठवून घरी आणा आणि मग ते पाणी संपूर्ण घरात शिंपडा.

धनप्राप्तीसाठी उपाय

गंगा नदीत स्नान करून सुपारी, आंबे, पाण्याने भरलेली घागरी, सत्तू, हंगामी फळे, गूळ, हाताचा पंखा, छत्री, डाळिंब, नारळ, केळी, खरबूज, सुपारी इत्यादींचे दान करावे. . असे केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि धनप्राप्तीचा मार्गही मोकळा होतो. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story