मृत्यूदंडाच्या विरोध थेट Cannes च्या रेड कार्पेटवर; इराणच्या 'त्या' मॉडेलचा ड्रेस पाहून वळल्या सर्वांच्या नजरा

फाशीचा ड्रेस

महलाघा जबेरीनं जो ड्रेस परिधान केला होता त्याच्या गळ्याच्या इथे जी डिझाइन होती ती एका फाशीच्या दोऱ्या प्रमाणे होती. त्यामुळे इराणमध्ये हा मोठा वाद सुरु झाला आहे.

इराणसाठी एक खास मेसेज

इराणमध्ये देण्यात येणाऱ्या सततच्या फाशीला पाहता त्याच्या विरोधात असल्याचे सांगण्यासाठी महलाघानं हा ड्रेस परिधान केला होता.

महिलांसाठी आहे इराणमध्ये कठोर नियम

इराणमध्ये कट्टरपंथियांच्या हाती सत्ता आहे. सरकारमध्ये महिलांसाठी कठोर नियम आहेत. त्यांना हिजाब परिधान करण्यासाठी मजबूर करण्यात येते.

हिजाब विरोधात झालं होतं आंदोलन

काही काळापूर्वी इराणच्या स्त्रियांनी हिजाब विरोधात आंदोलन केले होते. सरकार विरोधात सुरु असलेल्या या चळवळीला पाहता त्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना फाशी देण्यात आली.

महलाघा जबेरीचा असा होता ड्रेस

महलाघा जबेरीनं काळ्या रंगाचा बॉडी कॉन ड्रेस परिधान केला आहे. या ड्रेसच्या पुढच्या बाजुला म्हणजेच गळ्याचा इथे फाशीचा दोर आहे तर मागच्या बाजुला फाशी देणं बंद करा असं लिहिलं आहे.

फाशीचा विरोध दाखवत महलाघानं केला हा लूक

इराणी लोकांचा फाशीला असलेला हा विरोध दाखवण्यासाठी महलाघा जबेरीनं कान्सच्या रेड कार्पेटवर असा ड्रेस परिधान केला. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता तिथे लागले आहे.

कोण आहे महलाघा जबेरीच्या या ड्रेसचा डिझायनर

महलाघा जबेरीच्या या ड्रेसला डिजाइन डिझायनर जिला सेबरनं डिझाइन केलं आहे.

महलाघा जबेरीनं दिला मेसेज

महलाघा जबेरीनं तिच्या ड्रेसचा व्हिडीओ शेअर करत फाशीची शिक्षा बंद करा असा मेसेज दिला आहे. तिच्या ड्रेसच्या पाठचा भाग काही कारणांमुळे कान्सच्या रेड कार्पेटवर असलेल्या सिक्योरिटीच्या लोकांनी दाखवू दिला नाही, असे तिनं सांगितलं.

इराणच्या लोकांना केलं समर्पित

महलाघानं हा व्हिडीओ शेअर करत पुढे सांगितलं की "76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल हा इराणच्या लोकांना मी समर्पित केला आहे." (All Photo Credit : Mahlagha Jaberi Instagram)

VIEW ALL

Read Next Story