गणपती म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वाआधी गणरायाची मुर्ती येते आणि त्यानंतर येतात ते मोदक.
पण गणपती बाप्पाला मोदक का आवडतात तुम्हाला ठाऊक आहे का? गपणतीला मोदक नैवद्य म्हणून का दाखवला जातो माहितीये का?
गणपतीला मोदक आवडण्यामागे एक दंतकथा सांगितली जाते. ही दंतकथा एका युद्धासंदर्भातील आहे.
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या गणरायाशी परशुरामाने युद्ध पुकारले.
या युद्धादरम्यान गणरायाचा एक दात तुटला. दात तुटल्याने बाप्पाला काहीही खाता येत नव्हते. त्यामुळे त्याला प्रचंड त्रास होत होता.
यामुळे अनेक देवी देवता गणपतीला खाण्यासाठी काय देता येईल? यावर विचार करु लागले.
यावेळी काहींना मोदक बनवण्याची युक्ती सुचली. मोदक खाताना बाप्पाला त्रासही होणार नाही असा यामागील विचार होता.
मोदक हा गोड असल्याने त्याचा गोडवा दिर्घकाळ कायम राहतो. यामुळेच गरम आणि नरम मोदक हे बाप्पाला दात नसतानाही खाता आले.
तसेच पुराणकाळात देवतांनी अमृतापासून तयार करण्यात आलेला एक मोदक पार्वती देवीला भेट दिला, असंही सांगितलं जातं.
त्यावेळी बाप्पाने पार्वती मातेकडून मोदकांचे गुण जाणून घेतले. तेव्हा बाप्पाला मोदक खाण्याची तीव्र इच्छा झाली आणि त्यांनी तो मोदक खाल्ला.
हा मोदक खाऊन बाप्पा संतुष्ट झाला. त्यानंतर गणरायाला मोदक अधिक प्रिय झाले. म्हणूनच गणरायाला मोदकांचा नैवद्य दाखवला जातो.