Nokia G42 5G कसा आहे? पाहा Specifications आणि किंमत

नोकिया जी42 5G एका आठवड्यापूर्वी भारतात लॉन्च झाला आहे.

स्वस्तात मस्त स्मार्टफोन

स्वस्तात मस्त स्मार्टफोनच्या तुम्ही शोधात असाल तर नोकिया जी42 5G हा उत्तम फोन असून त्याचा तुम्ही नक्कीच विचार करु शकता. पाहूयात याचे फिचर्स आणि किंमत...

फोनचे डायमेन्शन्स कसे?

नोकिया जी42 5G मध्ये 6.56 इंचांची एचडी डिस्प्ले स्क्रीन देण्यात आली आहे. ही स्क्रीन 90 एचझेड रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.

5G प्रोसेसर आणि 3 रंग

किंमतीचा विचार केल्यास या फोनचं सर्वात मोठं फिचर म्हणजे त्यामधील 5 जी कनेकक्टीव्हीटी आहे. यासाठी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. 3 रंगात हा फोन उपलब्ध आहे.

ऑप्रेटिंग सिस्टीम कोणती?

अॅण्ड्रॉइड 13 ऑप्रेटींग सिस्टीमवर काम करणाऱ्या नोकिया जी42 5G बरोबर कंपनी 2 वर्षांसाठी मोफत ऑप्रेटिंग सिस्टीम अपग्रेड देणार असल्याचं जाहीर केलं आहे.

कॅमेरा सेटअप कसा?

नोकिया जी42 5G मध्ये 50 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल सेन्सर असलेला ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला 8 मेगापिक्सल सेन्सर कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी किती?

नोकिया जी42 5G स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच बॅटरी आहे. यामध्ये 20 वॅट फास्ट वायर्ड चार्जिंगची सोय आहे.

एकच व्हेरिएंट

नोकिया जी42 5G चं केवळ एकच व्हेरिएंट लॉन्च करण्यात आलं आहे.

किंमत किती?

नोकिया जी42 5G च्या 6 जीबी + 128 जीबी व्हेरिएंट भारतामध्ये 12,599 रुपयांना उपलब्ध आहे.

कुठे घेता येईल विकत

नोकिया जी42 5G हा फोन Amazon वर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

VIEW ALL

Read Next Story