अक्षय्य तृतीयाचा शुभ दिवस शुक्रवारी 10 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण यादिवशी चुकूनही 5 गोष्टी करु नका. अन्यथा माता लक्ष्मी नाराज होईल.
यादिवशी कोणालाही उपाशी ठेवू नका. अगदी गाय, पशुपक्षी यांनाही अन्न पाणी खायला द्या.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका किंवा कोणाकडूनही पैसे मागू नका.
अक्षय्य तृतीयेला शास्त्रानुसार देवाला नैवेद्य अपर्ण करा. पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण आणि विधी करा.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणालाही अपशब्द किंवा कोणाशीही गैरवर्तन करु नका. अगदी कोणाचा अपमानही करु नका.
अक्षय्य तृतीयेला मांसाहार आणि मद्यपान करु नका. यामुळे नवग्रह कमजोर होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)