शास्त्रानुसार घरातील देवाऱ्यात अशुभ वस्तू ठेवल्यानं नकारात्मकता पसरते.
ताणतणाव, दु:ख,चिडचिड यांमुळे घरात सुख-समृद्धी नांदत नाही.
देवाऱ्यात 'या' वस्तू शक्यतो ठेवू नका.
घरातील मंदिरात तुटलेल्या मूर्ती ठेवणं हे अशुभ मानलं जात. यामुळे नकारात्मकतेकजी सुरुवात होते. देव-देवता आपल्यावर नाराज होऊ शकते.
देवाऱ्यात रुद्र अवताराच्या मूर्ती किंवा फोटो ठेऊ नका. तसंच लक्ष्मीचा उभा असलेला फोटो देखील ठेऊ नका.
देवांच्या आरतीची पुस्तकं किंवा धार्मिक ग्रंथ जर फाटलेली असतील तर ती देवाऱ्यात न ठेवता वाहत्या पाण्यात सोडावीत.
देवाऱ्यात मृत्यू झालेल्या सदस्यांचे फोटो लावू नका.
देवघरातील निर्माल्यातील फुलंवगैरे निर्माल्य कलशात सोडावी.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)