वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक घर, वास्तूची दिशा आणि सामानाशी संबंधितही काही नियम सांगण्यात आले आहेत. चुकीच्या जागी चुकीची गोष्ट ठेवली असता त्याचे थेट परिणाम त्या वास्तूत वावरणाऱ्यांवर होतात.
चप्पल- बूट आणि ते ठेवण्याची पद्धतही आर्थिक परिस्थितीवर प्रभाव पाडते. त्यामुळं चपला नेमक्या घराच्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात ते एकदा पाहाच.
वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार घराच्या उत्तर - पूर्व दिशेला चप्पल किंवा बूट ठेवणं, फार अशुभ ठरतं. ही दिशा सकारात्मकतेची आहे, त्यामुळं तिथं पादत्राणे ठेवू नका.
बेडरुममध्येही चप्पल किंवा बूट ठेवू नका. असं केल्यास नकारात्मक उर्जा फोफावते. उशीपाशीही चप्पल काढून झोपू नका, हे अतिशय अशुभ आहे.
ज्यांना जीवनात प्रगतीपथावर पुढे जायचं आहे, त्यांनी निळ्या रंगांच्या चपलांना प्राधान्य द्या. असं केल्यास प्रत्येक कामात यश मिळतं.
मळकट किंवा तुटलेल्या चपला किंवा बूट कधीच वापरु नका. असं केल्यास आर्थिक फटका आणि दारिद्र्याचं हे लक्षण आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)