आषाढी शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित केला जातो.
हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी मंगळवार 16 जुलै रात्री 8:33 मिनिटांनी सुरू होईल तर 17 जुलै रोजी रात्री 09:02 वाजता समाप्त होईल. तर उदयतिथिच्या निमित्ताने यंदा देवशयनी एकादशीचे १७ जुलै रोजी साजरी करण्यात येईल.
पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूं 4महिने योगनिद्रासाठी क्षीरसागरात जातात. या 4 महिन्यांत एकही शुभ कार्य केले जात नाही.
असे म्हणतात की या दिवशी जे लोक व्रत करतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात.तुम्हीही देवशयनी एकादशीचे व्रत करणार असाल तर पूजा साहित्य जाणून घ्या.
देवशयनी एकादशीची पूजा करताना पिवळ्या कापडाचा दिवा, भगवान विष्णूची मूर्ती , माता लक्ष्मींची मूर्ती, तूप , गोपी चंदन, शुद्ध गंगाजल, मिठाई , पंचमेवा, आंब्याची पाने, फळ, पिवळी फुलं, धूप, एकादशी कथा ग्रंथ , पंजिरी, पंचामृत , केळीची पाने . गुळ, मध आणि आसन यांचा समावेश सामग्रीमध्ये असणं गरजेचं आहे.
देवशयनी एकादशीची पूजा करताना या मंत्रांचा जप केल्यास सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. ओम भुरिडा भुरी देहीनो, मा दभ्रम भुरया भर. भूरी घेदिंद्र दितासी । ओम भूरिदा त्यासी श्रुताः पुरुत्र शूर वृत्राहण । आ नो भजस्व राधासी ।