प्रत्येक भारतीय मुलाच्या आठवणींमध्ये कॅम्लिन स्टेशनरीचे विशेष स्थान आहे. शाळेमध्ये वापरल्या जाणाऱ्या क्रेयॉन्सपासून ते पेनपर्यंत या कंपनीने वैविध्य दिसून आले.
1931 मध्ये डी.पी.दांडेकर आणि त्यांचे बंधू जी.पी.दांडेकर यांनी कॅम्लिन या लोकप्रिय ब्रँडचा पाया घातला. आणि हळूहळू व्यावसायाचा विस्तार करत क्रेयॉन्ससोबतच कॅमल इंक बाजारात आणली.
कंपनाची विस्तार करत असताना 2011 मध्ये त्यांनी कॅम्लिनचा 50.47 टक्के हिस्सा जपानी स्टेशनरी कंपनी दांडेकर कोकुयोला विकला आणि यानंतर ते कोकुयो कॅम्लिनचे मानक अध्यक्ष म्हणून काम करू लागले.
कॅम्लिन हे बाजारात सर्वोच्च स्टेशनरींपैकी एक लोकप्रिय ब्रँड असून 2000 पेक्षा जास्त प्रकारची उत्पादने जगभरात विकत आहे.
आर्ट मटेरियल क्षेत्रात दबदबा असलेली ही कंपनी भारताव्यतिरिक्त 1095 पेक्षा जास्त मनुष्यबळासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये व्यवसाय करते.
शाईला नवा रंग देणारी व्यक्ती अशी ओळख असणारे कॅम्लिनचे संस्थापक सुभाष दांडेकर यांनी सोमवारी वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि या ब्रँडनं पुन्हा सर्वांचं लक्ष वेधलं.