रविवारी केस कापल्याने धन, बुद्धी आणि धर्म याचा नाश होतो. आत्मविश्वास कमी होतो.
शनिवारी केस कापण्याची चूक करू नका. असे केल्याने शनिदेव क्रोधित होतात असा समज आहे. यामुळे जीवनात खूप दुःख येते.
केस कापण्यासाठी शुक्रवार हा सर्वात शुभ दिवस आहे. शुक्रवारी नखे आणि केस कापल्याने सौंदर्य वाढते. धन-वैभव वाढते. कीर्ती प्राप्त होते.
गुरुवारी केस कापणे किंवा मुंडण केल्याने खूप अशुभ परिणाम होतात. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा कोप होते. यामुळे धनहानी आणि मान-सन्मानाची हानी होण्याची शक्यता असते.
बुधवार नखे आणि केस कापण्यासाठी खूप शुभ आहे. बुधवारी केस कापल्याने संपत्ती वाढते. जीवनात आनंद वाढतो.
मंगळवारी केस कापल्याने आयुर्मान कमी होते. तर, मंगळवारी केस कापल्याने कर्जापासून मुक्तता मिळते असे काही लोकांचे मत आहे.
सोमवारी केस कापू नये. यामुळे मुलांना त्रास होतो. मानसिक दुर्बलताही येते.