चाणक्य यांनीच या महापापासंदर्भात सविस्तर माहिती सांगून ठेवली आहे. जाणून घ्या त्याचसंदर्भात...
आचार्य चाणक्य यांनी अशा महापापाबद्दल सांगितलं आहे की ज्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची माफीच अस्तित्वात नाही.
कोणतीही व्यक्ती हत्यारापेक्षा आपल्या शब्दांनी दुसऱ्यांना घायाळ करु शकतो, असं चाणक्य सांगतात.
तुमचे शब्द ही एकमेव अशी गोष्ट आहे जी समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्षात स्पर्शही न करता मोठा आघात करु शकतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
त्यामुळेच चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, जी व्यक्ती ईश्वर स्वरुप आई-वडिलांबद्दल अपशब्द वापरते ती महापाप करते. अशा व्यक्तीला महापापी असं म्हटलं जातं असंही चाणक्य नीति सांगते.
आपल्याला जन्म देणाऱ्या आई-वडिलांबद्दल अपशब्द बोलणे हेच जगातील महापाप आहे, असं चाणक्य सांगतात.
आचार्य चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, कोणत्याही व्यक्तीकडून होणारं हे असं पाप आहे ज्याच्यासाठी त्याला कधीच माफी मिळू शकत नाही.
रागात व्यक्ती आपल्या आई-वडिलांबद्दल असे शब्द वापरतात. त्यानंतर आयुष्यभर त्यांना त्यांनी वापरलेल्या शब्दांचा पश्चाताप होत राहतो, असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे.
आपल्या मुलांनी दिलेल्या अशा प्रकारच्या वागणुकीमुळे आई-वडिलांच्या मनाला फार वेदना होतात, असं चाणक्य सांगतात.
आई-वडिलांनी आपल्या मुलांना त्यांनी वापरलेल्या शब्दांसाठी माफ केलं तरी देव या चुकीसाठी कोणालाही माफ करत नाही, असं चाणक्य म्हणतात.