चाणक्य यांनी दानासंदर्भात 3 महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे असं म्हटलंय. पाहूयात याचसंदर्भात...
आचार्य चाणक्य यांनी 3 अशा गोष्टींबद्दल सांगितलं आहे ज्या खर्च करण्यासाठी कधीही पुढचा मागचा विचार करता कामा नये.
आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या या 3 गोष्टी खर्च करताना कधीच कंजूसपणे वागता कामा नये असंही म्हटलं आहे.
या अशा 3 गोष्टी आहेत ज्या दान केल्याने दान करणाऱ्या व्यक्तींला फायदाच अधिक होतो.
चाणक्य यांच्या सांगण्यानुसार, गरीब लोकांना सधन व्यक्तींनी मनमोकळेपणे मदत केली पाहिजे.
गरीबांना मदत करताना कोणत्याही सक्षम व्यक्तीने कंजूसपणा करता कामा नये, असा सल्ला चाणक्य देतात.
तुमच्याकडे पुरेशी संपत्ती असेल तर खास करुन एखाद्या व्याधीने पीडित असलेल्या, कोणाचाही आधार नसलेल्या लोकांच्या उपचारांचा खर्च करावा. असा खर्च करण्यापासून मागे हटू नये.
जी व्यक्ती अशा गरजू लोकांना मदत करते ती धार्मिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून स्वत:ला अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवते असं चाणक्य म्हणतात.
चाणक्य यांच्या सांगण्यानुसार प्रत्येक व्यक्तीला धर्म आणि कर्माच्या नावाने दान केलं पाहिजे.
जेव्हा संधी मिळेल तेव्हा कोणत्याही धार्मिक स्थळावर दान आवश्यक करावं, असं चाणक्य सांगतात.
समाज आणि देशाच्या कल्याणासाठीही दान करणं महत्वाचं असतं. असं दान करताना कधीच विचार करता कामा नये, असं चाणक्य सांगतात.
Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.