आजच्या धावपळीच्या आयुष्यात पैशांमध्ये धावाताना आपल्याकडून अनेक गोष्टी राहून जातात. आपल्या वागण्याने जवळच्या व्यक्तींना त्रास होतो. हाच त्रास होऊ नये यासाठी चाणक्य नीतिमध्ये काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख केला आहे.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिमध्ये वैवाहिक जीवन सुखी, समाधानी असावं यासाठी काय करता येईल याबद्दलची माहिती दिली आहे.
अनेकदा महिला आपल्या पतीपासून समाधानी नसतात. मात्र याची कल्पना पतीला नसल्याचं दिसून येतं, असा उल्लेख चाणक्य नीतिमध्ये आहे.
पत्नी असमाधानी असेल तर कशापद्धतीने ती इशाऱ्यांमधून व्यक्त होते हे आपण पाहूयात. चाणक्य नीतिमध्ये असमाधानी बायका कशा वागतात याबद्दल काय सांगितलंय पाहूयात...
बायकांना बोलायला फार आवडतं. त्या अचानक शांत झाल्या तर त्या असमाधानी आहेत असं समजावं, असं चाणक्य नीति सांगते.
अचानक पत्नीचं बोलणं कमी होणं हे ती असमाधानी असल्याचं लक्षण आहे. पतीवर असलेली नाराजी न बोलून व्यक्त करणे ही सर्वात सोपी पद्धत बायका वापरतात, असं चाणक्य यांनी सांगितलं आहे.
पत्नी बोलत नसेल तर तिच्याबरोबर जास्तीत जास्त विषयांवर बोलण्याचा प्रयत्न करा. ती का नाराज आहे हे समजून घ्या तरच यावरील उपाय सापडू शकेल, असं चाणक्य नीति सांगते.
कोणत्याही पत्नीला पतीला नाराज कारयला आवडत नाही. त्यातही ती नाराज असेल आणि तिच्याकडे दूर्लक्ष केलं तर वाद होऊ शकतात, असा इशारा चाणक्य यांनी दिला आहे.
छोट्या छोट्या कारणांवरुन पत्नी वाद घालत असेल तर हा ती नाराज आणि असंतुष्ट असल्याचे संकेत आहेत, असं समजावं असं चाणक्य म्हणतात.
चाणक्य नीतिमधील उल्लेखाप्रमाणे, पत्नी अचानक पतीपासून दूर राहू लागली, त्याच्यापासून अंतर ठेऊ लागली तर ती नाराज आहे असं समजावं.
चाणक्य नीतिनुसार, पत्नी एकटी राहू लागते तेव्हा ती केवळ स्वत:बद्दल विचार करतेय की काय असं पुरुषांना वाटतं.
पत्नी नेहमीप्रमाणे तुमची काळजी घेत नसेल तर ती नाराज आहे, असं समजावं असा उल्लेख चाणक्य नीतिमध्ये आहे.
Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.