उचक्या थांबतच नाहीत? एका मिनिटात अशा करा बंद

उचकी आल्यावर कुणीतरी आठवण काढली असेल असं आपण सहसा म्हणतो.पण उचकी येण्यामागचं खरं कारण तुम्हाला माहितेय का?

अचानक उचक्या सुरु झाल्यावर आपण पाणी पितो, किंवा अनेक जण साखर खातात, यामुळे काहींची उचकी थांबते. पण काहींना हा उपाय लागू होत नाही.

चला तर मग उचकी का लागते आणि उचकी थांबण्यासाठी काय करावं हे जाणून घेऊया..

उचकी का येते ?

1) उचक्या येण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील एक म्हणजे घाईघाईत जेवल्यानं आणि भुखेपाक्षा जास्त खाल्ल्यानं उचकी येऊ शकते.

2)सिगारेट, अल्कोहोलसारख्या पदार्थांचं सेवन केल्यानंसुद्धा उचक्या लागतात.

3)गरम पदार्थ खाल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाल्यानं किंवा तापमानात अचानक झालेल्या बदलांमुळेही उचक्या लागु शकतात.

उचकी कशी थांबवाल ?

उचक्या लागल्यावर थंड पाणी पिऊ शकता, किंवा काही सेकंदासाठी श्वास रोखून ठेवू शकता.

एका ग्लास मीठ टाकून थंड पाणी प्यायल्यानेही उचकी थांबू शकते.

VIEW ALL

Read Next Story