शत्रूपेक्षा कमी नाहीत असे मित्र

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीशास्त्रात कोणत्या प्रकारच्या व्यक्तींपासून दूर राहिलं पाहिजे याबद्दल सांगितलं आहे.

मित्र आयुष्यभराचा साथीदार

प्रत्येकाच्या आयुष्यात मित्र महत्त्वाचा असतो. कारण मित्र हाच आपल्या सुख, दु:खाचा साथीदार असतो.

अशा मित्रांवर विश्वास नका ठेवू

पण आचार्य चाणक्यने नीति शास्त्रात कोणत्या मित्रांवर विश्वास ठेवू नका हे सांगितलं आहे.

समोर गोड बोलणारे

आचार्य चाणक्य सांगतात की, पाठीमागून तुमचं वाईट चिंतणारे आणि समोरुन गोड बोलणाऱ्या मित्रांपासून दूर राहा.

असे मित्र विषाप्रमाणे

त्यांनी सांगितलं आहे की, असे मित्र विषाप्रमाणे असतात. जे तुमच्यासमोर गोड गोड बोलतात आणि मागून वाईट बोलतात.

विषाने भरलेलं भांडं

आचार्य चाणक्य सांगतात की, तुमच्यासमोर गोड बोलणारी व्यक्ती ही विषाने भरलेल्या भांड्याप्रमाणे असतात.

अशा मित्राचा त्याग करा

त्यामुळे अशा मित्राचा त्याग करणं उचित असतं. त्याला मित्र समजू शकत नाही. तो आपला शत्रूच असतो.

दृष्ट आणि गॉसिपिंग

आचार्य चाणक्य सांगतात दृष्ट तसंच गॉसिपिंग करणाऱ्या मित्रांवर विश्वास ठेवू नका.

भांडण झाल्यावर सगळं उघड करतात

असे मित्र जेव्हा नाराज होतात तेव्हा सर्वांसमोर तुमच्या खासगी, गुपित गोष्ट बोलून दाखवतात.

VIEW ALL

Read Next Story