वनवासात पांडवांनी आपली शस्त्रे आणि चिलखत शमीच्या झाडात लपवून ठेवली होती, अशी आख्यायिका आहे.
त्यामुळे दसऱ्याला शमीची पूजा करण्याची परंपरा आहे.
दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केल्याने मनुष्य अनेक प्रकारच्या संकटांपासून वाचतो आणि प्रत्येक क्षेत्रात विजयी होतो, अशी मान्यता आहे.
शमीच्या झाडाची पूजा केल्याने शनि ग्रहाशी संबंधित सर्व दोष दूर होतात.
विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने घरातील तंत्र-मंत्राचा नकारात्मक ऊर्जा नाहीसा होतो.
शमी पूजन केल्यामुळे सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी ताजी पडलेली पाने सोबत ठेवा किंवा महादेवाला अर्पण करा. शमीची पाने कधीही तोडू नयेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)