Condom : संबंध ठेवताना कंडोम फाटू नये म्हणून सेक्स दरम्यान 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा महागात पडेल

सुरक्षित सेक्ससाठी कपल्स कंडोमचा वापर करतात. यामुळे अनावश्यक गर्भधारणा तर टळतेच, सोबत शारीरिक संबंधांमार्फत पसरणाऱ्या इन्फेक्शनचा धोकाही टळतो.

दरम्यान इंटीमेट होताना अनेक वेळा कंडोम फाटतो अशी परिस्थिती उद्धभवू नये यासाठी कंडोम फाटण्याची कारणं जाणून घेतली पाहिजे. जेणेकरून शारीरिक संबंध ठेवताना असं होणार नाही.

शारीरिक संबंध ठेवताना जर समोरच्या व्यक्तीला कोरडेपणाची समस्या असेल तर त्यावेळी ल्युबचा वापर नक्की करावा. कोरडेपणामुळे कंडोम वापरताना फाटला जाण्याची दाट शक्यता असते.

अनेकजण ल्यूब म्हणून इतर गोष्टींचा वापर देखील करतात. या गोष्टी कंडोममध्ये खूप बारीकपणे प्रवेश करण्याची दाट शक्यता असते.

ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोहोचत नाही त्या ठिकाणी कंडोम ठेवावं. जास्त थंडीच्या ठिकाणीही कंडोम ठेवू नये. यामुळे देखील कंडोम फाटण्याची शक्यता असते.

जर तुम्ही पहिल्यांदा कंडोम वापरणार असाल तर त्याचा वापर कसा करायचा याची माहिती घ्या. जर ते चुकीच्या पद्धतीने वापरलं गेलं तर लैंगिक संबंधादरम्यानच ते फाटण्याची शक्यता असते.

शारीरिक संबंध ठेवताना अशा कंपनीचे कंडोम घ्या, जे अधिक सुरक्षित आणि दर्जेदार असेल.

VIEW ALL

Read Next Story