लहान मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी पालकांनी करा 'या' गोष्टी

Nov 21,2023


घरात लहान मुले असली की घर भरलेलं वाटतं.


पालक म्हणून आपल्यावर अनेक जबाबदाऱ्यासुद्धा येतात.


आपल्या मुलांना हसरं,आनंदी आणि कॉन्फिडंन्ट ठेवण्यासाठी हे प्रयत्न करू शकतो.


तुमच्या चालण्या बोलण्याचे अनुकरण लहाण मुलं करत असतात त्यामुळे आपण त्यांच्या पुढे कसे वागतो हे महत्त्वाचे आहे.


लहान मुलांना अनेक प्रश्न पडतात म्हणून ते सतत प्रश्न विचारतात त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना शांतपणे उत्तर द्या ,त्यांच्या शंकांचे निरसन करा.


मुलांना टीव्ही, मोबाईल, कॉम्पुटर यांच्यापासून लांब ठेवून त्यांना मैदानी खेळ खेळायला सांगा.


त्यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आणून देऊन सौम्य शब्दात समजावून सांगा.


तसंच लहान मुलांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्यांचं कौतुक करून त्यांना भेटवस्तू द्या.


मुलांचे आवडीचे पदार्थ आठवड्यातून दोन ते तीन वेळा बनवा.


मुलांशी गप्पा मारून,वेगवेगळ्या गोष्टीवरून त्यांचं मत लक्षात घ्या.

VIEW ALL

Read Next Story