कोलकात्याची खाद्यसंस्कृती चाखण्यासाठी थोडं नवी मुंबई बाजूला गेलात तर, तिथे सीबीडी बेलापूर येथे असणाऱ्या बाँग अड्डामध्ये जाऊन मटण कोशा बिर्याणी न विसरता खा आणि पार्सलही न्या.
वांद्रे अर्थात Bandra मध्ये असणारं लकी रेस्तराँसुद्धा बिर्याणीसाठी बऱ्याच वर्षांपासून प्रसिद्ध आहे. त्यामुळं इथंही एकदा हजेरी लावा.
भायखळा येथे असणाऱ्या पर्शियन दरबारमध्ये येऊन एकदातरी रान बिर्याणीची चव चाखा. हो, पण इथं ताव मारून खाणाऱ्या मंडळींनीच जा बरं.
चर्नी रोड किंवा जाफर भाईज दिल्ली दरबारची कुठंही ब्रांच असल्यास तिथं मटण दम बिर्याणी आवर्जून खा. दीर्घकाळ दम देऊन शिजवलेली ही बिर्याणी म्हणजे सुख.
Biryania हे रेस्तराँ नाही, तर एक टेक अवे बिर्यानी हाऊस आहे. इथं तुम्हाला इटालियन पासून पारंपरिक बिर्याणीपर्यंतचे पर्याय मिळतात. पण, यांची काश्मीरी बिर्याणी एक नंबर.
मोहम्मद अली रोडच्या गर्दीमध्येसुद्धा नूर मोहम्मदी हे हॉटेल तुम्हाला लहज सापडेल. इथं येऊन तुम्ही white Biryani नक्की खा.
डोंगरी येथे असणाऱ्या निझाम या हॉटेलमध्ये तुम्हाला हैदराबादी पद्धतीची बिर्याणी खायची संधी मिळेल ही संधी चुकवू नका.
कुलाबा आणि हॉर्निमन सर्कल परिसरात असणाऱ्या 'बडेमियाँ' या रेस्तराँमध्ये चिकन आणि मटण बिर्याणीची चव न चुकता घ्या. कारण, इथं बिर्याणी खाणं हा एक कमाल अनुभव.