मुंबईतील ताज हॉटेल भारतातच नव्हे तर जगातील प्रसिद्ध हॉंटेल्सपैकी एक आहे.
ताज मध्ये एकदा तरी जावं अशी अनेकांची इच्छा असते. ताज हॉटेलमध्ये डिनर डेटला जायचं असेल तर किती खर्च येतो? असा प्रश्न इंटरनेटवर विचारला जातो.
दोन लोकांच्या जेवणाचा खर्च किती येतो? असा प्रश्न एकाने कोरावर विचारला होता.
त्यावर एकाने उत्तर दिले, मी गर्लफ्रेण्डला घेऊन ताजला गेलो होतो. जिथे मसाला क्राफ्ट नावाच्या इन हाऊस रेस्तरॉंमध्ये जेवलो.
दोघांनी ज्यूस, स्नॅक्स,एक चिकन डिश,बटर नान, भात, देसी कबाब आणि गुलाब जामून अशी डिश घेतली.
या जेवणाचं बील 7 हजार रुपये झालं.
अशाच एका प्रश्नाला उत्तर देताना दुसऱ्या एका युजरने लाऊंजमध्ये भुफे खाण्याचा सल्ला दिला.
हाय टी वेळी एकाच्या जेवणाची किंमत 3 हजार रुपये इतकी आहे.अशाप्रकारे 6 हजारमध्ये अनेक खाण्याचे आयटम ट्राय केल्याचे त्याने सांगितले.
ताज हॉटेलमध्ये एखादे कपल 5 ते 7 हजार रुपयांमध्ये डिनर करु शकते असे उत्तर एकाने दिले.
एका युजरच्या माहितीनुसार हे बील 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
सर्वांच्या कमेंट्स वाचल्या तर असं लक्षात येतं की ताज हॉटेलमध्ये एखादे कपल 7 ते 8 हजार रुपयांत डिनर करु शकते.