आजपासून सिद्धिविनायक मंदिर बंद, पाहा कधीपासून घेता येणार दर्शन

शुभं काम असो किंवा नवीन गोष्टीची सुरुवात अनेक भाविक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आवर्जून जात असतात. यातच आता भाविकांना निराश करणारी बातमी समोर आली आहे.

सिद्धिविनायक मंदिर आजपासून ( 3 जानेवारी) पुढेच पाच दिवस बंद राहणार आहे.

सिद्धिविनायक मंदिरात श्रींच्या मूर्तीला सिंदूरलेपन करण्यासाठी मंदिर प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर आजपासून 5 दिवस बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.

त्यामुळे सिद्धिविनायक मंदिर आजपासून 5 दिवस बंद राहणार असल्याची माहिती दिली आहे.

त्याऐवजी श्रीच्या प्रतिमेचे दर्शन भाविकांना दिले जाणार आहे. सोमवारी दुपारी 1 वाजल्यापासून नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून भाविकांना श्रींचे दर्शन देण्यात येणार आहे.

त्यामुळे तुम्ही सिद्धिविनायकाच्या दर्शन घेण्यासाठी काही नियोजन करत असाल तर सध्या ते करता येणार नाही.

VIEW ALL

Read Next Story