सिडकोच्या घरांच्या किमती 4 ते 5 लाखांनी कमी होणार; पाहा तुम्हाला कसा मिळणार फायदा...
हक्काच्या घराच्या शोधात प्रत्येकजण असतो, त्या प्रत्येकालाच मदत होते ती म्हणजे म्हाडा, सिडकोची आणि अर्थातच काही शासकीय योजनांची.
नुकतीच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या घरांच्या किमती कमी करण्याबाबत सिडकोकडून मुख्यमंत्री कार्यालयापुढे प्रस्ताव देण्यात आला होता.
सदर प्रस्तावामुळं खारकोपर, बामणडोंगरी इथं असणाऱ्या सिडकोच्या घरांमध्ये घट होणार आहे.
थोडक्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर घेणाऱ्यांसाठी राज्य शासनाकडून एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
दिवाळीच्याच मुहूर्तावर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येणाऱ्या सिडकोच्या घरांच्या किमती मोठ्या फरकानं कमी होण्याची शक्यता आहे.
उपलब्ध माहितीनुसार सिडकोकडून खारकोपर आणि बामणडोंगरीमध्ये 7849 घरांची योजना आखण्यात आली आहे. ज्यांची किंमत येत्या काळात 4- 5 लाख रुपयांनी कमी होऊ शकते.
थोडक्यात येत्या काळात नवं घर घेण्याचा बेत आखत असाल, तर ही संधी हातची जाऊन देऊ नका.