ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेलं, लोकल खोळंबल्यानं रेल्वेतून उतरुन चालत असताना आजोबांच्या हातून बाळ निसटलं. या बाळाचा शोध सुरू आहे.

बाळ नाल्यात पडल्याने मातेवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तिचा आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता..

विरार येथील विवा कॉलेज जवळ साचलेले पाणी गेटमधून आता शिरले.

उल्हासनगरमध्ये कमरेच्या वर पाणी साचले होते.

नवी मुंबईतही मुसळधार पाऊस पडला. पनवेल येथीपल हे दृष्य.

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे एकाच जागी थांबवल्याने प्रवासी रेल्वे रुळावरुन चालत होते.

मुसळधार पावसाचा मोठा फटका लोकल वाहतुकीला बसला आहे.

VIEW ALL

Read Next Story