Isha Ambani आणि Alia Bhatt

मध्ये बिग डील, काय आहे प्रकरण?

Sep 07,2023


बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी यांच्यामध्ये मोठी डील झाली आहे.


आलियाने 2020 मध्ये एड-ए-मम्माची सुरुवात केली. लहान मुलांचे पोशाख, किशोरवयीन मुलांचे आणि मातृत्व पोशाख बनवते आणि विकते.


आता आलियाच्या क्लोदिंग ब्रँड एड-ए-मम्मामध्ये रिलायन्स रिटेलने 51 टक्के बहुसंख्य हिस्सा विकत घेतला आहे.


रिलायन्स नेहमी अशा ब्रँडची प्रोत्साहन देतं जे मजूबत उद्देशाने पुढे जातं. आलियाचा ब्रँडही तसाच असल्याने आम्ही ही डील केल्याच ईशा अंबानीने सांगितलं.


या डीलची घोषणा केल्यानंतर आलियाने ईशासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


ही पोस्ट शेअर करताना आलिया म्हणाली की दोन मातांच्या एकत्र येण्यामुळे हा करार आणखी खास बनतो.


Myntra, Ajio, Firstcry, Amazon आणि Tata Cliq सारख्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्म आणि वेबस्टोअर, लाइफस्टाइल आणि शॉपर्स स्टॉपमध्ये Ed-a-Mamma चे उत्पादन मिळतं.

VIEW ALL

Read Next Story