मत्स्य अवतार

मत्स्य अवतार हे भगवान विष्णूचे पहिले अवतार आहे . मत्स्य अवतारामध्ये भगवान विष्णूने माशाचे अवतार धारण केले होते आणि श्रुष्टीची रक्षा केली.

कूर्म अवतार

भगवान विष्णूचे दुसरे अवतार कूर्म अवतार आहे. कूर्म म्हणजे कासव असा आहे. या अवतारात भगवान विष्णूने समुद्रमंथनाचे वेळी मेरू पर्वताची रवी करून देव व दैत्य हे त्यास घुसळू लागले, तेंव्हा मेरू पर्वताची उंची ही समुद्राच्या खोलीपेक्षा कमी पडली. म्हणून मेरू पर्वत बुडू लागला तेंव्हा भगवान विष्णूने कूर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर पर्वत तोलून धरले होते.

वराह अवतार

वराह अवतार हे भगवान विष्णूचे तिसरे अवतार आहे. या अवतारामध्ये त्यांने पृथ्वीला असुर हिरण्यक्षापासून वाचवले होते . असुराने पृथ्वी चोरून तिला आदिम पाण्यात लपवले तेव्हा तिला सोडवण्यासाठी विष्णू वराहाच्या रूपात प्रकट झाले.

नरसिंह अवतार

नरसिंह अवतार हे भवन विष्णूचे चौथे अवतार आहे . नरसिंह म्हणजे अर्धा नर व अर्धा सिंह. या अवतारात भगवान विष्णूने आपल्या प्रल्हाद या भक्ताचे प्राण वाचवले आहे.

वामन अवतार

वामन अवतार हे भगवान विष्णूचे पाचवे अवतार आहे . अदिती आणि कश्यप ऋषी यांच्या पुत्राच्या रूपात येऊन भगवान विष्णूने इंद्रदेवाची मद्दत करून दैत्य-राजा बळी समोर तीन पावले उचलून त्याला मात दिली

परशुराम अवतार

भगवान विष्णूच्या सहाव्या अवतारात त्यांने परशुरामाचे अवतार घेतले आहे . हे अवतार म्हणजे ब्राह्मतेज व क्षात्रतेज याचा मिलापच आहे.

राम अवतार

भगवान विष्णूचे राम अवतार हे सातव्या आणि सर्वात लोकप्रिय अवतारांपैकी एक आहे. हिंदू धर्मामध्ये राम अवतार सर्वोच्च मानले जाते.

कृष्णा अवतार

कृष्णा अवतार हे भगवान विष्णूचे आठवे अवतार आहे. हे अवतार हिंदू धर्मात सर्वोच्च देवाच्या रूपात पुजले जाते. कृष्णा हे अवतार सुरक्षा, करुणा, कोमलता आणि प्रेम याचे प्रतीक आहे.

बुद्ध अवतार

भगवान विष्णूचे नऊवे अवतार गौतम बुद्धाचे आहे. अग्नि पुराणानुसार, दैत्यांनी त्यांच्या युद्धात देवांचा पराभव केल्यामुळे भगवान विष्णूने पृथ्वीवर हा अवतार धारण केला.

कल्की अवतार

कल्की अवतार हे भगवान विष्णूचे चे दहावे अवतार मानले जाते. हे भविष्यातील अवतार आहे अशी मान्यता आहे . चार कालखंडापैकी शेवटचं कालखंड असून कलियुगाच्या अंतानंतर येणारे कल्की देवदत्त नावाचे अवतार हे शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, तेजस्वी तलवारांनी सर्व पापी अधर्म दुष्ट लोकांचा विनाश करणार तेव्हा सतयुग प्रारंभ होईल.

VIEW ALL

Read Next Story