देशाच्या कोनाकोपऱ्यात रेल्वेचं जाळं पसरलं आहे. दररोज लाखो प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करतात.
जगातील सर्वात मोठ्या रेल्वे सेवांमध्ये भारताचा चौथा क्रमांक आहे. आपल्या देशात जवळपास 8 हजाराहून अधिक रेल्वे स्थानकं आहेत.
भारतात रेल्वे मार्गाची लांबी जवळपास 65,415 किलोमीटर इतकी असून दररोज जवळपास 231 लाख प्रवासी आणि 33 लाख टन मालाची वाहतूक भारतीय रेल्वेतून होते.
भारतीय रेल्वेसंदर्भात अनेक मनोरंजक गोष्टीसुद्धा आहेत. विशेष म्हणजे भारतातील रेल्वे स्थानकांचा स्वत:चा असा इतिहास आहे.
यापैकीच एक इतिहास म्हणजे काही रेल्वे स्थानकांमागे रोड असं लिहिलेलं असतं. पण तुम्हाला माहित आहे का रोड असं का लिहिलेलं असतं.
ज्या रेल्वे स्थानकाच्यामागे रोड असं लिहिलेलं असते ती स्थानकं शहरापासून काहीशी दूर आहेत.
काही वेळा एकाच शहरात दोन रेल्वे स्थानकं असतात, यापैकी शहरापासून लांब असलेल्या स्थानकासमोर रोड शब्द जोडला जातो.