अनेकवेळा आपल्या मनात सापाबद्दल गैरसमज असतात. बहुतेकदा आपल्या सोयीसाठी आपण त्यांच्या जीवावर उठतो.
पण तुम्हीसुद्धा हेच गैरसमज बाळगून आहात का की साप फक्त त्रासच देतात तर एकदा हे नक्की वाचा .
खरतर सापाचा मेंदू एवढा विकसित नाही की ते एखाद्या व्यक्तीची प्रतिमा लक्षात ठेवून त्याच्यावर डुख धरेल.कधीकधी अन्नाच्या शोधात किंवा इतर मादीच्या शरीरातून निघणाऱ्या गंधाचा शोधात साप येत असतात.
सर्वच साप विषारी नसतात यामुळे बिनविषारी साप चावल्याने काही अपाय होत नाही. बेशुद्ध पडणे, नाडी न लागणे या फक्त मनातील भीतीमुळे दिसून येतात. जर तुम्हाला विषारी साप चावला तर लक्षणे समजण्यासाठी काही काळ जावा लागतो.त्यादरम्यान तुम्ही प्राथमिक उपचार घेऊ शकता.
कोणत्याही सर्पाचं विष अंगार, मंत्र तंत्र, गंडदोरे याने उतरत नाही तर त्यासाठी फक्त वैद्यकीय उपचारच परिणामकारक मंत्र आहे.
पडक्या जागा किंवा मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणी साप आपलं वस्तीस्थान निर्माण करतात. अशा जागांवर कधीतरी धन सापडले असेल त्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला असावा.
खरतर नागमणी नावाचा कोणताही घटक अस्तित्वात नाही. ते प्रत्यतक्षात नागाच्या पित्ताशयात तयार झालेले बेन्झाइन अॅसिडचे खडे असतात जे विषाद्वारे बाहेर फेकले जातात.
कोणत्याही सर्पाला कान नसतात.त्याची दृष्टी देखील काही अंतरावरील आपले खाद्य ओळखू शकेल एवढेच असते. खरतर त्यांना फक्त जमिनीवर निर्माण होणाऱ्या आघात कंपने त्वचेला जाणवात आणि ते त्यांना प्रतिसाद देतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)