या सर्व कलाकृती साकारत असताना अनेक कलाकारांचा हातभार लागला. त्याचीच ही झलक.
चित्ररथावरील महाराजांना पाहताना अनेकांच्याच नजरा वळल्या.
इथं एका तरुणीला देवीचं रुप देण्यात आलं आहे. हा चित्ररथ साकारला आहे तुषार कोळी यांनी.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्ररथावर दिसणारं हे तुळजाभवानीचं रूप एक मूर्ती नाही.
चित्ररथांमध्ये एक दृश्य होतं ते म्हणजे आई तुळजाभवानी आणि तिच्यापुढे नतमस्तक झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं.
इथं अनेक चित्ररथही साकारण्यात आले. यातील प्रत्येक चित्ररथाचं वैशिष्ट्य होतं.