मुंबईतील गुन्हेगारी जगताविषयी आजवर बरंच लिहिलं- बोललं गेलं. अशा या मुंबईच्य अंडरवर्ल्डमधील एक नाव म्हणजे दाऊद.
जेव्हाजेव्हा शहरातील गुन्हेगारी विश्वाचा विषय निघतो तेव्हा दाऊद आणि छोटा राजन ही नावं हमखास घेतली जातात. कारण, एक काळ असा होता जेव्हा ही दोन नावंच शहरात चर्चेचा विषय होती.
छोटा राजन आणि दाऊद अंडरवर्ल्ड डॉन असण्यासोबतच एकमेकांचे खूप चांगले मित्रही होते. 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर या मैत्रीचं रुपांतर शत्रूत्वात झालं.
वसूली, हत्या आणि तस्करी, अपहरण अशी कामं दाऊद आणि छोटा राजनची माणसं करत होती.
मॅच फिक्सिंग, स्मगलिंग, रिअल इस्टेट क्षेत्रातही दाऊद आणि छोटा राजनची टोळी काम करत होती.
खंडणीपासून चित्रपटांसाठी पैसा पुरवण्यापर्यंतच्या कामासमवेत अंमली पदार्थांची तस्करीसुद्धा या टोळ्या करत आणि यातूनच बक्कळ पैसा कमवत.