लॅपटॉपमध्ये, युजर्संना स्क्रीन-कास्टिंगचा एक सोपा पर्याय मिळतो. या फीचरच्या मदतीने लॅपटॉप स्क्रीनवर दिसणारा कंटेंट समोरच्या स्क्रीनवर दाखवता येतो.

बऱ्याच युजर्सना हे फिचरे नेमके कसे वापरायचे हेच माहित नसते. यामुळे त्यांना लॅपटॉप स्क्रीनवरच त्यांचे काम पूर्ण करावे लागते.

सुरुवातीला तुमचा लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही चालू करा. यानंतर तुमचा लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्ही दोन्ही एकाच वायफाय नेटवर्कशी जोडलेले असल्याची खात्री करा.

लॅपटॉपच्या क्विक टॉगलवर जा आणि प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक करा. तुम्ही हा ऑप्शन सेटिंग्जमध्ये देखील शोधू शकता.

कास्ट किंवा प्रोजेक्ट ऑप्शनमध्ये स्मार्ट टीव्हीचे नाव दिसत असल्यास, त्यावर क्लिक करा आणि लॅपटॉप स्क्रीन टीव्हीवर दिसू लागेल. जर लिस्टमध्ये स्मार्ट टीव्ही दिसत नसेल तर अधिक डिस्प्ले सेटिंग्जवर जा.

आता मल्टिपल डिस्प्ले पर्यायावर क्लिक करा. तिथून Connect to a wireless display वर क्लिक करा आणि नंतर Connect वर क्लिक करा.

सर्व नवीन स्मार्ट टीव्ही मॉडेल्समध्ये स्क्रीन-कास्टिंगचा पर्याय आहे आणि तुम्ही लॅपटॉपवर मोबाइल डिव्हाइसची स्क्रीन देखील पाहू शकता. मात्र काही टीव्ही मॉडेल्समध्ये ही पद्धत वेगळी असू शकते.

VIEW ALL

Read Next Story