गिरगाव आणि जुहू चौपाटी

सुंदर समुद्र किनारा, संध्याकाळची वेळ आणि मस्त पाणीपुरी. यासाठी हक्काचं ठिकाण म्हणजे गिरगाव आणि जुहूची चौपाटी....

May 29,2023

पृथ्वी कॅफे

मुंबईच्या रस्त्यांवर मिळणारी पाणीपुरी छान पैकी प्लेट मध्ये सजवलेल्या एखाद्या हॉटेल डिश प्रमाणे ‘पृथ्वी कॅफे’ मध्ये तुमच्या समोर येईल. पृथ्वी थिएटर जवळ, 20, जानकी कुटीर, जुहू चर्च रोड, मुंबई, महाराष्ट्र 400094

सिंधी पाणीपुरी हाऊस

सिंधी पद्धतीची म्हणजे या पाणीपुरीत ‘रगडा’च्या जागी ‘बुंदी’ वापरली जाते. गेल्या ३० वर्षापासून सिंधी पाणीपुरीवाले या वेगळ्या प्रकारची पाणीपुरी खाऊ घालत आहेत. पत्ता : शॉप नंबर 13, चेंबूर कॉलनी, डॉ. चोटीराम गिडवाणी रोड, चेंबूर, मुंबई, महाराष्ट्र 400074

जय बजरंग चाट कॉर्नर

तुम्ही पाणीपुरीसाठी अगदी वेडे आहात आणि त्यासाठी तुम्ही पैज लावायला तयार असाल तर जय बजरंग चाट कॉर्नर तुमचीच वाट बघत आहे. पत्ता : शॉप नं. 2, मामलतदार वाडी, रोड नं. 1, जनसेवा बँक, मालाड (प.), मुंबई, महाराष्ट्र 400064

विठ्ठल भेलपुरी हाऊस

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून अगदी जवळ असलेल्या विठ्ठल भेळवाला हा पाणीपुरीसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्ही तुम्हाला हवी तशी भेळ तयारही करू शकता. पत्ता : 5, सीएसएमटी, ए.के. नायक मार्ग, मुंबई, महाराष्ट्र-400001.

गुरुकृपा पाणीपुरी

सायन स्थानकापासून जवळच असलेलं गुरुकृपा हे आणखी एक पाणीपुरीसाठी प्रसिद्ध दुकान आहे. इथला सामोसा आणि पाणीपुरी अख्ख्या एरियात फेमस आहे . पत्ता : 40, गुरु कप बिल्डींग, रोड-24, एसआयइएस कॉलेज जवळ, सायन, मुंबई.

स्वाती स्नॅक्स

ताडदेव भागातील एक प्रसिद्ध ठिकाण जे पाणीपुरी, शेवपुरी आणि डोश्यासाठी प्रसिद्ध आहे. स्वाती स्नॅक्स त्यांच्या उत्तम गुणवत्ता आणि सेवेसाठी प्रसिद्ध आहे. पत्ता : 248 कराइ एस्टेट, जावजी दादाजी मार्ग, भाटीया हॉस्पिटलच्या समोर, ताडदेव, मुंबई, महाराष्ट्र 400007.

बी. भगत ताराचंद

बी. भगत ताराचंद पाणीपुरीवाला हा ठाण्याच्या ‘विवियाना मॉल’ मधला हक्काचं पाणीपुरीवाला आहे. पत्ता : १४, फूड कोर्ट, दुसरा मजला, विवियाना मॉल, माजीवाडा, ठाणे(प.)

झामा स्वीट्स

पाणीपुरी, शेवपुरी बरोबर जलेबी, कुल्फीची मजा लुटण्यासाठी झामा स्वीट्स हक्काचं ठिकाण आहे. पाणीपुरी खाऊन झाल्यावर झामाची शेव बर्फी खायला विसरू नका. पत्ता : 2, अतुर पार्क, सायन ट्रॉम्बे रोड, चेंबूर, मुंबई,

प्रशांत कॉर्नर

ठाण्यातील प्रशांत कॉर्नर मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. पण इथली पाणीपुरी सुद्धा तोडीस तोड आहे राव. अप्रतिम पाणीपुरी आणि शेवपुरी तुम्हाला इथे मिळेल. पत्ता : गगनगिरी सोसायटी, पाचपाखाडी, ठाणे(प.)

VIEW ALL

Read Next Story