'हीरामंडी'साठी 'आलमजेब'ने 'मामा'कडून किती घेतली फी?

शर्मिन सेहगल सध्या 'हीरामंडी: द डायमंड बाझार' मुळे चर्चेत आहे. तिचा मामा आणि सिने निर्माता संजय लिला भन्सालीची ही पहिली वेब सिरिज आहे.

शर्मिन सेहगल ही यामध्ये आलमजेबच्या भूमिकेत दिसतेय. ज्यामध्ये ती मनिषा कोइराला म्हणजेच 'मल्लिकाजान'ची मुलगी दाखवलीय.

या सिरिजनंतर शर्मिन खूप ट्रोल झाली. पण याचा तिच्यावर फारसा परिणाम होताना दिसत नाही.

तिचा अभिनय साऱ्यांनाच आवडलाय. आता तिच्या फी ची चर्चा सुरु आहे.

या सिरिजमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनिषा कोइराला, अदिती राव हैदरी, ऋचा चढ्ढा आणि संजीदा शेख सारख्या अभिनेत्री आहेत.

सोनाक्षीला डबल रोलसाठी 2 कोटी, मनिषाला 1 कोटी, आदितीला 1 ते 1.5 कोटी, ऋचाला 1 कोटी आणि संजिदाला 40 लाख रुपये मानधन मिळाले.

शर्मिनला तिच्या मामा भन्सालीकडून 35 लाख रुपये फी मिळाली. 'मनी कंट्रोल' आणि 'प्रेस्टीज'ने यासंदर्भात वृत्त दिलंय.

शर्मिनने आपल्या करिअरची सुरुवात 2019 मध्ये आलेल्या मलाल सिनेमातून केली. यासाठी तिला बेस्ट डेब्यु अभिनेत्रीच्या फिल्मफेअरसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं.

शर्मिनने 2023 मध्ये आपला बॉयफ्रेण्ड आणि व्यावसायिक अमन मेहतासोबत लग्न केले.

VIEW ALL

Read Next Story