कोण होते नरेंद्र दाभोलकर?
नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रातील एक समाजिक कार्यकर्ते होते. 1 नोव्हेंबर 1945 मध्ये त्यांचा जन्म झाला होता. देवदत्त दाभोलकर यांचे ते धाकटे बंधू.
मिरज येथील सरकारी वैद्यकिय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं. ज्यानंतर ते राष्ट्रीय सेवा दलाच्या संपर्कात आले होते.
समाजातील अंधश्रद्धांविरोधात लढण्यासाठी म्हणून ही संघटना काम करत होती. जवळपास 12 वर्षे वैद्यकिय क्षेत्रात काम केल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला त्यांनी श्याम मानव यांच्या अध्यक्षतेखालील अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती (ABANS) सोबत काम केलं.
काही मतभेदांमुळं त्यांनी ही संघटना सोडून पुढं स्वत: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करत आपलं कार्य सुरु ठेवलं.
20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात मॉर्निग वॉकला गेलेल्या दाभोलकर यांना दोन दुचाकीस्वारांनी जीवे मारलं. या खळबळजनक घटनेच्याच दिवशी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं.
दाभोलकरांच्या हत्या प्रकरणाचा तपास सुरुवातीला पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. ज्यानंतर 2014 मध्ये हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. 2019 मध्ये सीबीआयनं याप्रकरणात संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं.
10 मे 2024 रोजी अखेर या प्रकरणाचा निकाल लागला. जिथं वीरेंद्र तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर, सचिन अंदूरे, शरद कळसकर यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध करत त्यांना जन्मठेप आणि 5 लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.