'त्या' पहाटे नक्की काय घडलं होतं?

राज्यात पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीची चर्चा सुरु झाली आहे. फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी शरद पवारांचा डाव होता असा आरोप केला आहे. तर पवारांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

पहाटेचा 'तो' शपथविधी अन् महाराष्ट्र

दरम्यान, त्या दिवशी पहाटे नेमकं काय घडलं होतं हे जाणून घ्या

मुख्यमंत्रिपदावरुन वाद

भाजप 105 आमदारांसह सर्वात मोठा पक्ष बनला होता. शिवसेना-भाजप युतीत लढले होते, पण मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु झाला होता.

ठाकरे-फडणवीस आमने-सामने

एकीकडे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी अमित शाह यांच्याशी मातोश्रीवर चर्चा झाल्याचा दाव करत होते. तर फडणवीस हे नाकारत होते.

महाविकास आघाडी स्थापनेच्या हालचाली

यामुळे सत्तास्थापनेचा दिवस लांबवणीवर जात होता. दुसरीकडे महाविकास आघाडी स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला होता.

23 नोव्हेंबर 2019 ची धक्का देणारी पहाट

त्यातच अचानक 23 नोव्हेंबर 2019 ला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथ घेऊन अवघ्या महाराष्ट्राला धक्का दिला होता.

पवार-फडणवीसांनी घेतली शपथ

अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे 15 आमदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

राष्ट्रवादीच्या आमदारांची ऐनवेळी माघार

भाजपाला बहुमतासाठी आमदार कमी पडत होते. पण, अजित पवारांसह आलेल्या आमदारांनी ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाची बाजू घेतली.

शरद पवारांच्या एंट्रीने बिघडलं गणित

दुसरीकडे शरद पवारांनी अजित पवारांनी जे केलं त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा संबंध नाही, कोणताही आमदार पाठिंबा देणार नाही, असं जाहीर केलं.

साडेतीन दिवसात सरकार कोसळलं

यानंतर पहाटेचं हे सरकार जास्त काळ टिकू शकलं नाही. अवघ्या साडेतीन दिवसात सरकार कोसळलं.

चौथ्या दिवशी राजीनामे

चौथ्या दिवशी सकाळी अजित पवारांनी माघार घेतली आणि उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर फडणवीसांनाही माघार घ्यावी लागली आणि त्यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.

सर्वात कमी कालावधीचं सरकार

सर्वात कमी कालावधीचं सरकार म्हणून याची नोंद झाली.

महाविकास आघाडीचं सरकार

यानंतर अवघ्या आठवड्याभरात नवं समीकरण जुळलं आणि 28 नोव्हेंबरला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

VIEW ALL

Read Next Story