या आठवड्यात तीन सुट्ट्या सलग आल्या आहेत. त्यामुळं अनेकजळ या सुट्ट्यात फिरण्याचा प्लान आखत असतील
रोजच्या गोंधळापासून दूर फिरण्याचा प्लान करत असाल तर ट्रॅकिंगहा सर्वोत्तम पर्याय आहे. मुंबईनजीकचा एक किल्ला तुमच्यासाठी बेस्ट डेस्टिनेशन आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवणजवळील किल्ले धोडप हा भटकंतीसाठी खूप चांगला पर्याय आहे.
सातमाळ डोंगररांगेतील महादेवाच्या पिंडीसारखा एक किल्ला दिसतो. या किल्ल्याला एक चौकोनी खाचही दिसते.
हट्टी हे छोटसं गाव हाच धोडपचा पायथा. नाशिकपासूनचं हट्टीपर्यंतचं अंतर ६०-६२ किमी आहे.
गावातून साधारण वीस मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. किल्ल्यावर जाण्यासाठी जंगलातून पायवाट आहे.
किल्ल्यावर सोनारवस्ती आहे. तिथेच गणपती व शंकराचे मंदिर आहेत. त्यानंतर अजून थोडं चालल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो
गडाच्या एका भागावर कातळभिंत तयार झालेली आहे. ही कातळभिंत म्हणजे लकॅनीक प्लग’ची रचना आहे.
धोडपची भटकंती एका दिवसाची आहे. एक दिवसांत तुम्ही पूर्ण किल्ला पाहू शकता