मध्य कोकणातील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील ठिकाण दुरशेत. हिरवीगार जंगले, रिव्हर राफ्टिंग आणि हायकिंगसाठी निसर्गाच्या खुणा यासाठी प्रसिद्ध आहे.
सुंदर समुद्रकिनारा, ऐतिहासिक किल्ला आणि धबधबे पाहायला मिळतात. रायगड जिल्हयातील अलिबाग हे किनारपट्टीचे शहर. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. येथे भाऊचा धक्क्यावरुन बोटीनेही जाऊ शकता.
माथेरान एक मोहक हिल स्टेशन आहे. याठिकाणी तुम्ही टॉय ट्रेन राईड घेऊ शकता. हे ठिकाण निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते.
कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. ते निसर्ग ट्रेल्स, पक्षीनिरीक्षण आणि किल्ला ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून हे ठिकाण जवळ आहे.
डोंगर आणि नद्यांनी वेढलेले हे कर्जत हे शहर आहे. येथे ट्रेकिंग करता येऊ शकते. पावसाळा सुरु झाल्याने येथे धबधबे पाहायला मिळतात.
कामशेत हे पुण्याजवळील ठिकाण. पॅराग्लायडिंगचा आनंद घेण्यासाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आणि रिअल इस्टेट विहंगावलोकन आहे. एक डोंगराळ ठिकाण , कामशेत हे समुद्रसपाटीपासून सुमारे 2200 फूट उंचीवर आहे.
एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. याठिकाणी निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळेल. लँडस्केप्स, धबधबे आणि ट्रेकिंग ट्रेल्ससाठी लोणावळा ओळखले जाते. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे.
लोणावळ्याला लागून, ही ठिकाण आहे. येथील दृश्ये, लेणी आणि हिरवीगार हिरवळ सुखद आनंद देतात. मुंबई आणि पुण्यापासून जवळ आहे.