चिंचोळे रस्ते, अजूनही शहरीकरण न झालेलं हरिहरेश्वर गाव, पर्यटकांना नेहमी खुणावते. समुद्राची कानी पडणारी गाज लक्ष वेधून घेते. या गावात पोचताच इथलं साधेपणा तुम्हाला आपलासा वाटू लागतो. रिसोर्ट्स पिकनिक्सचाही कंटाळा आला असेल तर हरिहरेश्वरला नक्कीच भेट द्या.
Ganpatipule - रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे 1600 वर्षांपूर्वीचे स्वयंभू गणपती मंदिर. हा समुद्रकिनारा कोकणात खूपच प्रसिद्ध आहे.
रत्नागिरीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटरवर रत्नदुर्ग किल्ला आहे. किल्ल्यावर भगवती मंदिर आहे. समुद्रापर्यंत इथे भुयारी मार्ग जातो. हा किल्ला समुद्राच्या काठावरील असणाऱ्या डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याच्या पाथथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. हा किल्ला शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून जिंकून घेतला होता.
अतिशय शांत आणि रमणीय समुद्रकिनारा. स्वच्छतेसाठी प्रसिद्ध. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध किनारा पैकी हा एक समुद्रकिनारा. येथे तुम्हाला समुद्र लाटांचा आनंद घेता येईल. या ठिकाणी सूर्यास्ताच्या वेळी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. श्रीवर्धनमधील लक्ष्मीनारायण मंदिर प्रसिद्ध आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील मुरुड - जंजिरा प्रसिद्ध ठिकाण. शिवाय कोकण पर्यटन स्थळे म्हणून अलिबागमधील अनेक स्थळं प्रसिद्ध आहेत. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी हा जंजिरा शेवटपर्यंत अजेय राहिला.
कोकणातील तारकर्लीचा समुद्रकिनारा हा खूपच प्रसिद्ध झाला आहे. कारण आता या समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग आणि अन्य अॅक्टिव्हिटीही सुरु करण्यात आल्या आहेत. कोकणामधील सर्वच समुद्रकिनारे हे अतिशय स्वच्छ आहेत
कोकण म्हटलं की डोळ्यसमोर उभा राहतो तो बहरलेला निसर्ग. कोकणचा निसर्ग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. तसेच तो खुणावतो. ज्यांनी कोकण पाहिलेला नाही. त्यांच्यासाठी कोकण काय आहे हे जाणून घ्यायचे असेल तर ही दहा ठिकाणी पाहिल्यावर लक्षात येईल की, किती निसर्गाची देणगी कोकणाला मिळाली आहे. सुंदर ठिकाणांना तुम्ही भेट द्या आणि एकदम फ्रेश व्हा. एकदा का निसर्गाच्या सानिध्यात गेलात की तुम्ही हरवून गेलाच म्हणून समजा. जाणून घ्या कोकणातील या ठिकाणांबद्दल...