हनिमूनसाठी महाराष्ट्रातली 'ही' रोमँटीक ठिकाणं असताना कशाला हवं मालदिव, व्हिएतनाम?

रत्नागिरी

कोकणातील सुंदर अशा रत्नागिरीमध्ये येऊन तुम्ही, दिवेआगर, गणपतीपुढे या आणि अशा किनाऱ्यांना भेट देऊन जोडीदारासोबत निवांत क्षण व्यतीत करू शकता. इथला निसर्ग तुमच्या मनाचा ठाव नक्की घेईल.

इगतपुरी

पावसाळा तोंडावर असल्यामुळं अवघ्या काही दिवसांतच नाशिकनजीक असणारं इगतपुरी नव्या रंगात न्हाऊन निघणार आहे. त्यामुळं जोडीदारासोबत हे Must Visit.

चौल

अलिबागपासून काही अंतरावर असणाऱ्या आणि नारळी- पोफळीच्या बागांमधून साद घालणारं एक ठिकाण म्हणजे चौल. छानसा समुद्र, टुमदार गावं आणि आदरातिथ्यासाठी सज्ज असणारे येथील स्थानिक तुमची सुट्टी खास ठरवतील यात शंका नाही.

माळशेज

ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यापासून काही अंतरावर असणाऱ्या माळशेजचं सौंदर्यसुद्धा आता भर पावसाच खुलताना दिसणार आहे. त्यामुळं जोडीदारासमवेत हा संपूर्ण भाग एकदातरी पाहाच.

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे ठिकाण नवं नसलं तरीही तिथपर्यंत पोहोचता पोहोचता तुम्हाला अनेक नवी ठिकाणं गवसतात. वाई, पाचगणी, भोसे, भिलार या आणि अशा गावांमध्ये राहून तुम्ही ऑफबिट ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. पावसाळ्यात तर इथं येण्याची बातच न्यारी.

कोलाड

जोडीदाराला थरारक अनुभवाची आवड असेल, तर पावसाळ्या तोंडावर खळाळणाऱ्या नदीमध्ये रिव्हर राफ्टींग करण्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही कोलाड गाठू शकता.

VIEW ALL

Read Next Story