शासकीय दुखवटा म्हणजे नेमकं काय? तो कधी जाहीर केला जातो

उद्योगरत्न रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले

Mansi kshirsagar
Oct 10,2024


टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.


आज महाराष्ट्र शासनाने आज शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.


पण शासकीय दुखवटा म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचे उत्तर जाणून घेऊया


शासकीय दुखवटा हा संपूर्ण राज्याचे किंवा राष्ट्राचे शोक व्यक्त करण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे.


राष्ट्रीय शोक जाहीर केल्यानंतर राज्यात किंवा देशातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जातो


या कालावधीत सरकारी कार्यक्रम साजरे केले जात नाहीत. मेळावे व सभादेखील घेतल्या जात नाहीत


मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होत नाहीत.


निधन झालेल्या व्यक्तीवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात.


अंत्ययात्रेच्या वेळेस पार्थिवावर देशाचा राष्ट्रध्वज ठेवला जातो. अंत्यसंस्काराच्या आधी हा ध्वज काढून सन्मानपूर्वक त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला जातो.


निधन झालेल्या व्यक्तीला संपूर्ण लष्करी सन्मानात मानवंदना दिली जाते. पोलिस दलाकडून बंदूकीच्या फैरी झाडून विशेष सलामी दिली जाते

VIEW ALL

Read Next Story