मुंबईत आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न जवळपास प्रत्येकाचं असतं. त्यामुळे हे स्वप्न साकार व्हावं यासाठी म्हाडा दरवर्षी कमी किंमतीत मुंबईत घर उपलब्ध करून देते.
8 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाण्यातील म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली. यंदा अनेक मराठी कलाकारांना 'कलाकार' कोट्यातून म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केला होता.
यापैकी काहींना मंगळवारी जाहीर झालेल्या लॉटरीत घर लागली आहेत. त्यामुळे त्यांचं मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण झालंय.
यंदा निघालेल्या लॉटरीत मराठी कलाकारांपैकी अभिनेत्री गौतमी देशपांडे, अभिनेता गौरव मोरे, निखिल बने, बिगबॉस मराठी सीजन 2 विजेता शिव ठाकरे यांना घर मिळाल्याचं समोर आलं आहे.
हास्यजत्रा फेम निखिल बने याला कन्नमवार नगर येथील म्हाडाच्या घराची लॉटरी लागली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे याला सुद्धा पवई परिसरातील घर लागलं आहे.
तर पवई येथील कलाकारांच्या कोट्यातील दुसरं घर हे बिगबॉस मराठी सीजन 2 विजेता शिव ठाकरे याला लागलं आहे.
पवईतील या घरांची किंमत 1 कोटी 80 लाखांच्या जवळपास असल्याचं कळतंय.
गोरेगाव येथील कलाकार कोट्यातून म्हाडाच्या दोन घरांसाठी तब्बल 27 जणांनी अर्ज केला होता. त्यामुळे ही घर नक्की कोणाला मिळणार अशी उत्सुकतता सर्वांना होती.
गोरेगाव येथील एक घर हे 'माझा होशील ना' मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला मिळालं आहे.