नागपुरात शहरातील काही भागात उद्यापासून म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
जवळपास 30 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पूर्व नागपूरातील भरतवाडा, कळमना भाग, नंदनवन, सक्करदरा, इंदोरा या भागातील अनेक जलकुंभावर 30 तास पाणी पुरवठा होणार नाही.
अमृत जल लाईनअंतर्गत पाईपलाईन जोडणी काम आणि मुख्य लाईनवरील गळती रोखण्यासाठी पाणीपुरवठा बंद असणार आहे.
20 सप्टेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून 21 सप्टेंबरला सायंकाळी 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
जगनाडे चौक, नंदनवन मुख्य रस्ता, खरबी रस्ता भागाअंतर्गत जोडणी असणार आहे.
खैरिपुरा डिप्टी सिग्नल, कॅन्सर हॉस्पिटल कळमना भागात गळती दुरुस्तीचे काम असणार आहे.