महाराष्ट्र हे भारतातील तिसरे मोठे राज्य आहे.
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3 लाख 7 हजार वर्ग किमी इतके आहे.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली.
महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. मुंबई ही राज्याची राजधानी आहे.
पण या राज्यातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे.
आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्या नगर ठेवण्यात आले आहे.
या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 17 हजार 48 वर्ग किमी आहे.