बाबा रामदेव यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते गाढविणीचं दूध पिताना दिसतायत. तर हे दूध चवीला स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.
गाढविणीच्या दुधामध्ये अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि पोषकतत्व असतात जे त्याला अधिक खास बनवतात.
गाढविणीच्या दुधात लॅक्टोजचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पचायला हलके असते. अपचन आणि आम्लपित्त सारख्या पोटाशी निगडित समस्या दूर करण्यासाठी ते फायदेशीर ठरते.
गाढविणीच्या दुधात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी यांचं चांगलं प्रमाण असतं. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारते ज्यामुळे संसर्ग रोगांपासून लढण्यास मदत मिळते.
गाढविणीच्या दुधात नैसर्गिक मॉइस्चराइज़र आणि अँटी एजिंग गुणधर्म असतात. हे त्वचेला सॉफ्ट आणि चमकदार बनवते.
गाढविणीच्या दुधात कॅल्शियम आणि फॉस्फरसचे चांगले प्रमाण असते, जे हाड मजबुतीसाठी फायदेशीर ठरतात.
काहीजणांना गायीच्या दुधाची ऍलर्जी असते. अशा लोकांसाठी गाढविणीचं दूध फायदेशीर ठरतं.
गाढविणीच्या दुधात अनेक पोषकतत्व असले तरी जर कोणाला लॅक्टोजची ऍलर्जी असेल तर तुम्ही या दुधाचे सेवन टाळावे.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)