वळणवाटांच्या वरंधा घाटात मान्सून राईडला जाताय? आधी हे वाचा...

वळणवाटा

पावसानं चांगला जोर पकडला की अनेकांचेच पाय महाराष्ट्रातील काही घाटांकडे वळतात. वळणवाटांच्या या रस्त्यावरून पुढं जाताना निसर्गाचं दिसणार रुप हे काही औरच असतं.

मान्सून

अशा या मान्सूनमध्ये कमाल चित्र पाहायला मिळतं ते म्हणजे वरंधा घाटात. पण, या घाटातून प्रवास करताना सतर्क राहणंही तितकंच गरजेचं.

अवजड वाहतूक

यंदाच्या वर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वरंधा घाटात अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भोरमार्गे महाड

पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट, अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद असेल. हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक बंद राहणार आहे.

अतिवृष्टी

पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात.

संभाव्य अनुचित घटना

पावसाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय असून 26 जून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत हा आदेश लागू असेल.

दरड कोसळल्यानं....

पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आठवड्यापूर्वी वरंध घाटातील वाघजाई मंदिराजवळ दरड कोसळल्यानं घाटातील संरक्षक कठडा तुटून रस्ता खचल्याची घटना घडली होती. .

VIEW ALL

Read Next Story