महाराष्ट्रात गिया बार्रे आजारामुळे चिंता वाढली आहे. जाणून घेऊया गिया बार्रे आजार नेमका कशामुळे होतो?

वनिता कांबळे
Jan 27,2025


पुण्यात गिया बार्रे आजाराने थैमान घातले आहे. एकाचा मृत्यू झाला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.


हात, पायात मुंग्या येतात,अशक्तपणा, बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणं ही या आजाराची लक्षणं आहेत.


गिया बार्रे होण्याची विविध कारणं आहेत. यामुळे खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.


गिया बार्रे आजारात आपली रोगप्रतिकार शक्ती म्हणजे इम्युन सिस्टीम आपल्याच शरीरावर हल्ला करते.


हा आजार जेव्हा अमेरिकेत आला होता तेव्हा दूषित पाणी हे त्याचं कारण समोर आलं होतं.


अस्वच्छता, पाणी दूषित असणे हे या आजाराला कारणीभूत ठरू शकतं.


बॅक्टेरिअर इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यामुळे देखील हा आजार होतो.


हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे योग्य उपचाराने रुग्ण बरा होऊ शकतो.

VIEW ALL

Read Next Story