चप्पल आणि शूज घरात उलटे का ठेवू नयेत? जाणून घ्या कारण

तेजश्री गायकवाड
Jan 28,2025


साधारणपणे आपण शूज किंवा चप्पल सरळ काढून ठेवतो. पण ती जर चुकून उलटी झाली तर घरातील मोठी लोक लगेच सरळ करायला सांगतात. चप्पल आणि शूज घरात उलटे का ठेवू नयेत? चला याबद्दल जाणून घेऊयात

असते अशुभ

वास्तुशास्त्रानुसार घरात शूज आणि चप्पल कधीही उलटे ठेवू नयेत. हे शुभ मानले जात नाही.

माता लक्ष्मी होते नाराज

असे मानले जाते की घरात शूज किंवा चप्पल उलटे ठेवल्यास देवी लक्ष्मीचा कोप होतो. अशा परिस्थितीत घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

होऊ शकते भांडण

उलटी झालेली चप्पल लगेच सरळ केली नाही तर त्यामुळे घरात विनाकारण भांडण होऊ शकते असे मानले जाते.

शनिदेवाचा कोप

असे मानले जाते की घरात बूट किंवा चप्पल ठेवल्याने शनिदेवाचा कोप होतो. यामुळे चप्पल उलटी करताच ती सरळ ठेवावी.

आर्थिक कोंडी

जर तुमच्या घरात चप्पल किंवा शूज उलटे ठेवले असतील तर त्यामुळे आर्थिक कोंडी होऊ शकते. यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story