7 आमदारांचं खासदार म्हणून प्रमोशन

लोकसभेच्या 2024 च्या निवडणूक लढलेल्या 16 आमदारांपैकी 7 आमदारांचं खासदार म्हणून प्रमोशन झालं आहे. यात 3 महिला आमदारांचा समावेश आहे. हे 7 आमदार कोण हे पाहूयात..

संदिपान भुमरे

छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून संदिपान भुमरे विजयी ठरले. त्यांनी ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे तसेच एमआयएमचे इम्जियाज जलील यांना पराभूत केलं.

वर्षा गायकवाड

काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून उज्वल निकम यांना पराभूत केलं.

प्रणिती शिंदे

सोलापूरमधून प्रणिती शिंदेंनी बाजी मारली. काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी विजय मिळवला.

रविंद्र वायकर

अवघ्या 48 मतांनी वायकर विजयी झाले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केला. ते उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडून आले.

निलेश लंके

अहमदनगरमधून भाजपाच्या सुजय विखे-पाटील यांना शरद पवार गटाने निलेश लंके यांनी पराभूत केलं.

प्रतिभा धनोरकर

चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करुन जायंट किलर ठरल्या. एकूण 57.9 टक्के मतं घेत विजयी.

बळवंत वानखेडे

काँग्रेसचे बळवंत वानखेडे अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणांविरुद्ध जिंकून आले आहेत.

VIEW ALL

Read Next Story