काळू धबधबा हा महाराष्ट्रातील माळशेज घाटातील सर्वात मोठा धबधबा आहे.

पुण्यापासून 110 किमी तर मुंबईपासून 90 किमी अंतरावर असलेल्या माळशेज घाटात काळू धबधबा आहे.

अहमदनगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळे गावापासून 4 किमी अंतरावर डोंगर कपारीतून हा काळू धबधबा वाहतो.

हरिश्चंद्रगडाच्या कुशीतून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो.

गर्द झाडी, धुके आणि उंच डोंगरातून प्रवाहित होणारा पांढराशुभ्र धबधबा. माळशेज घाटात पर्यटकांना निसर्गाचा सुंदर नजारा पहायला मिळतो.

वन डे पिकनिकचा प्लान असेल तर काळू धबधबा बेस्ट ऑप्शन आहे. कारण, येथे जाऊन तुम्ही एका दिवसात रिटर्न येवू शकता.

काळू धबधबा जितका सुंदर आहे तितकाच तो धोकादायक देखील आहे. यामुळे पर्यटकांनी खबरदारी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.

सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणाऱ्या या काळू धबधब्याची तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रियता आहे.

VIEW ALL

Read Next Story